• Sun. Apr 19th, 2026

केज पंचायत समितीतचा कंपाऊंड वाॅल निकृष्ट तर गुत्तेदार मजबूत. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फोडली.

Bybaba maske

Jul 11, 2023

केज पंचायत समितीतचा कंपाऊंड वाॅल निकृष्ट तर गुत्तेदार मजबूत.

शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फोडली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील अतिक्रमण उठल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पंचायत समितीने तात्काळ कंपाऊंड वाॅल बांधण्याचा निर्णय घेतला व काम सुद्धा चालु केले.ते अत्यंत निकृष्ट दर्जेच आहे.याची गुणनियंत्रण विभागा तर्फे चौकशी व्हावी. पण या साठी शासकीय ज्या प्रक्रिया  असतात त्या कुठे ही पालन केल्याचे दिसुन येत नाही.कारण अतिक्रमण उठवल्या बरोबरो कंपाऊंड वाॅल चे काम चालू झाले.जो गुत्तेदार निवडला तो कुठल्या प्रक्रियेने निवडला तसेच या साठी लागणारा निधी कुठून खर्च होत आहे याचा कांही मागमूस नाही.एखादा पंचायत समितीचा पदाधिकारी धरायचा व त्याला काम द्याचे असे येथील अधिकाऱ्यांचे धोरण आहे.हे निगरगट्ट अधिकारी शासन प्रक्रियेस सुद्धा जुमानत नाहीत येवढे मुजोर झाले आहेत.या गुत्तेदाराने पंचायत समितीची कमान उभी करण्या साठी केज साठी पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन सुद्धा उद्वस्त केली आहे.आता ही पाईपलाईन लाईन गुत्तेदार करतो का? जनतेचे करातून नगरपंचायत करते? या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  नगरपंचायत चे सत्ताधारी आधंळे झाले आहेत कारण पाईपलाईन फुटल्या मुळे शहरात काही ठिकाणी निर्जळी आहे.त्यात पुन्हा पाईपलाईन दुरुस्तीच काम एखाद्या आपल्या कार्यकर्त्याला देण्या साठी नगरपंचायत मोकळी.तरी पंचायत समिती ने असे शासकीय प्रक्रिये शिवाय एखाद्या गुत्तेदारास काम कसे दिले व जे निकृष्ट काम होत आहे त्याची गुणनियंत्रण विभागा कडून चौकशी करावी असी मागणी आता जनतेतून होत आहे.कारण अतिक्रमण पुन्हा बसु नये या कारणाणे कंपाऊंड वाॅल बांधण्याचा निर्णय घेतला पण तो गुत्तेदार पोसून मलई खाण्या साठी तर नाहीना?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!