• Mon. Jun 22nd, 2026

आरोग्य उपकेंद्राची जागा बळकाविण्याचा प्रयत्न आरोग्य उपकेंद्राच्या परिसरातील शौचालय पाडून मुरूम टाकून केला रस्ता :

Bybaba maske

Jul 12, 2023

आरोग्य उपकेंद्राची जागा बळकाविण्याचा प्रयत्न आरोग्य उपकेंद्राच्या परिसरातील शौचालय पाडून मुरूम टाकून केला रस्ता 

रोखठोक न्युज वार्ताहर 

आरोग्य उपकेंद्राचे शौचालय पाडून इमारती जवळ भराव टाकून रस्ता करून सदर जागा बळकविण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्याच्या भरावामुळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

केज तालुक्यातील साळेगांव येथील आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात असलेले पक्के शौचालय जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून इमारतीला चिकटून मुरूमाचा भराव टाकलेला आहे. सदर भराव व तीन ते चार फूट उंचीचा टाकून रस्ता केला असल्याने परिसरात जमा होणारे पाणी वाहून त्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी आरोग्य उपकेंद्राच्या इमातीत घुसून पूर्ण इमारत जलमय होणार आहे. सदर आरोग्य उपकेंद्राच्या आवारात असलेले झाड देखील तोडून टाकलेले आहे. दरम्यान या आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात रस्ता तयार करून सदर जागा बळकावण्याचा बेकायदेशीररीत्या प्रयत्न होत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभाग यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या बाबत गावातील काही नागरिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा :- जर याची चौकशी झाली नाही आणि आरोग्य उपकेंद्राच्या जागेतील अतिक्रमण हटविले नाही व बांधकाम पकडल्याची चौंकशी झाली नाही तर ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!