• Fri. Jun 5th, 2026

डॉक्टर मुलाने केला बापाचा खून बीडमधील धक्कादायक घटनेने खळबळ

Bybaba maske

Jul 19, 2023

डॉक्टर मुलाने केला बापाचा खून बीडमधील धक्कादायक घटनेने खळबळ

रोखठोक न्युज वार्ताहर 

डॉक्टर मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा मारा करुन खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देवून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छदनासाठी आणला.

याबाबद अधिक असे की, बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधिर सुरेश कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता.

यात त्याने आज मध्यराञी जन्मदात्या बापाचा ( सुरेश काशीनाथ कुलकर्णी वय 70) खून केला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. सुरेखा कलकर्णी वय 62 यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी वय 38 याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरा सुरु होती. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!