• Sun. Apr 19th, 2026

कारची समोरासमोर धडक कुटुंब गंभीर जखमी.

Bybaba maske

Jul 19, 2023

कारची समोरासमोर धडक कुटुंब गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 सिरसाळ्यातील तेलगाव रोडवर दोन कारचा समोरासमोर अपघात होऊन शिर्डी ला जाणारे आंध्र प्रदेशाचे कुटुंबातील व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना आज दिनांक १९ रोजी दुपारी घडली आहे.

आंध्र प्रदेशातील एक कुटुंब एपी २७ सिजी १४५ ह्या ब्रिजा कंपनी च्या गाडीतून परळी-सिरसाळा शिर्डी कडे जात होते. सिरसाळ्यात तेलगाव रोड वळणी रस्त्यात पुण्या कडून आलेली कार एम ए ) १२ पिएन ७६७५ ह्या कारशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात आंध्र प्रदेशातील एक महिला, दोन मुली, एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भिषण होता कि, दोन्ही गाड्या एकमेकांना धडकून चुरा झाल्या आहेत. घटनास्थळी सिरसाळा पोलीस स्टेशन चे सपोनि संदिप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी मुंडे, मेंडके, पोकळे, सय्यद, जेटेवाड यांना पाठवले, पोलीसांनी तात्काळ पोहचत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलवले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!