• Fri. Jun 5th, 2026

बांधावरचे झुडपे तोडल्याच्या कारणा वरून मारहाण करून दात पाडले !

Bybaba maske

Jul 22, 2023

बांधावरचे झुडपे तोडल्याच्या कारणा वरून मारहाण करून दात पाडले !

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील मस्साजोग येथे बांधावरील झाडे तोडल्याच्या कारणावरून महिलेला तिचे दीर, जाऊ आणि इतर दोघांनी बेदम मारहाण करून दात पाडल्याची घटना घडली आहे.

दि. २४ जून रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास मंगलबाई भागवत सोळुंके या व त्यांचे पती भागवत विश्वनाथ सोळुंके सर्वे नं. ९३,९४ व ९५ मधील शेतात मशागत करण्यासाठी बांधावरील झुडपे तोडली. तेंव्हा त्यांचे दिर सुर्यभान सोळुंके, जाऊ कांताबाई सोळुंके व पुतनी अश्वीनी शिंदे, तिचा मुलगा हरी दौलत शिंदे हे तेथे आले. त्यांनी झुडपे की तोडले म्हणुन शिवीगाळ केली. त्यांच्या भितीने मंगल सोळुंके आणि त्यांचे पती भागवत सोळुंके हे घरी आले.

मंगलबाई सोळुंके या घरी एकट्या असताना दुपारी २:३० वा. च्या सुमारास सुर्यमान विश्वनाथ सोळुंके, कांताबाई सूर्यभान सोळंके, दोन्ही (रा. मस्साजोग), पुतणी अश्विनी दौलत शिंदे, तिचा मुलगा हरी दौलत शिंदे दोन्ही (रा. शाहु नगर, केज) हे चौघे हातात काठ्या घेवून आले. मंगलबाई सोळुंके या घरात असताना त्यांच्या घरात घुसुन बांधावरील झुडपे का तोडली ? व ती वाटुन का दिली नाही ? असे म्हणून भांडणाची कुरापत काढुन शिवीगाळ केली. हरी दौलत शिंदे याने त्याचे हातातील लाकडी बॅटने पायाचे मांडीवर व बसण्याचे जागेवर मारून मारहाण करून दुखापत केली. तसेच अश्वीनी हिने तोंडावर बुक्का मारून समोरचा दात पाडला. कांताबाई हिने केसाला धरून खाली पाडले. त्या वेळी त्या घराबाहेर जात असताना सूर्यभान यांनी त्यांना घरात ढकलुन दिले व तुझा नवरा कोठे आहे. तुम्हाला कोयत्याने तोडतो. असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी मंगलबाई सोळंके यांच्या फिर्यादीवरून दि. २१ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४३४/२०२३ भा. दं. वि. ४५२, ३२३, ३२५, ५०४, ५०६ आणि ३४, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर दौंड हे करित आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!