• Fri. Jun 5th, 2026

एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर महावितरणा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. एकीकडे पाऊस मारतोय तर दुसरी कडे महावितरण आत्महत्येस परावृत्त करत आहे.

Bybaba maske

Aug 30, 2023

एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर महावितरणा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

एकीकडे पाऊस मारतोय तर दुसरी कडे महावितरण आत्महत्येस परावृत्त करत आहे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यात आज पहायला गेले तर दुष्काळ पडला आहे . शेतकरी ऐक तर या चिंतेने व्याकुळ झाला आहे आपली गुरे ढोरे ,पोटाची खळगी भरण्यासाठी रात्र दीवस झटपट करत आहे.त्यांत केज व अंबाजोगाई महावितरण कंपनीने धिंगाणा घातला आहे काही शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल आहेत.विहीरीला थोडे थोडे पाणी आहे त्या पाण्यावर अवलंबून शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना चारा मिळावा म्हणून चाऱ्याची सोय करत आहेत.परंतु त्या चाऱ्याला पानी देण्यासाठी विहीरीत, बोरमध्ये टाकलेल्या मोटर या लाईट वर चालतात परंतु केज-आंबाजोगाई महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ चालला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटरला प्रथम व्होल्टेज पाहिजे तेवढे मिळत नाही त्यांच शेतकऱ्यांच्या शेतावर असलेला डीपी जळतो तो जळालेला डीपी शेतकऱ्यांने महावितरण कंपनी आंबाजोगाई यांच्या कडे दुरूस्ती करण्यासाठी दिला तर तो डीपी शेतकऱ्यांना वेळेवर भेटत नाही.जरी भेटला तरी तो डीपी लोड देण्याआधी जळुन जातो .ऐका ऐका ठिकाणचा डीपी तीन वेळा जळतो तर महावितरण कंपनीचे अधिकारी काय गोट्या खेळायला आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच केजचे महावितरण अधिकारी यांना कुणी विचारले असे का होते तर ते बोलतात माझ्या हातात काही नाही वरीष्ठांना विचारा व वरीष्ठांना विचारले तर ते बोलतात तुमच्या अधिकाऱ्यांना विचार अशा प्रकारे केज तालुक्यातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी उत्तरे दिली जातात.मग केज व अंबाजोगाई महावितरण कंपनीचे अधिकारी काय करतात? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.या सावळ्या गोंधळात शेतकऱ्यांचे पीके जळुन राख होत आहेत.त्यांमुळे केज तालुक्यातील शेतकरी केज व अंबाजोगाई महावितरण कंपनी वर संतप्त झाले आहेत.कारण ऑगस्ट संपत आला तरी पाऊस काही पडत नाही.थोडे फार पाणी विहीर बोअरवेल ला आहे तर महावितरण वीज सुरळीत देत नाही.परंतु अंबाजोगाई -केज या महावितरण कंपनीचा सावळ्या गोंधळाला कुठे तरी वरीष्ठअधिकारी यांच्या कडून आळा बसवला पाहिजे अशी मागणी शेतकरीवर्गा कडून होत आहे.या वर लवकर सुरळीत वीज दिली नाहीतर महावितरणा विरोधात मोठे अंदोलन केले जाईल असे खात्रीलायक सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!