• Fri. Jun 5th, 2026

मृतव्यक्तीनेच दिली वृत्तपत्रात जाहिरात,माझी जागा माझे नावे करा.नगरपंचायतचा हाॅरर ड्रामा.

Bybaba maske

Aug 30, 2023

मृतव्यक्तीनेच दिली वृत्तपत्रात जाहिरात,माझी जागा माझे नावे करा.नगरपंचायतचा हाॅरर ड्रामा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.केज शहरातील जुने व्यापारी स्वर्गीय श्रीकांत बाबुराव शेटे यांची धारूर रोड येथे प्लॉट आहे तो नावे करून त्याची नोंद करून नक्कल मिळवण्या साठी त्यानी अर्ज केला असून तसी जाहिरात वृत्तपत्रात सुद्धा दिली आहे.एखाद्या मृत व्यक्तीच जर आपली जागा आपल्या नावे करा म्हणून अर्ज करून वृत्तपत्रात जाहिरात देतो.त्याची सर्व फिस(रक्कम) भरतो हे कसे काय हे समजायला मार्ग नाही.कारण श्रीकांत शेटे हे काही वर्षा पुर्वीच निधन झाले आहे.त्यात कहर म्हणजे त्यांचा मुलगा सचिन शेटे यांनी सुद्धा त्याच दिवशी त्याच वृत्तपत्रात ती जागा  आपल्या नावाने नोंद करावी व नक्कल द्यावी अशी मागणी केली आहे.असा हा संस्पेस हाॅरर ड्रामा नगरपंचायत चा भोंगळ कारभाराची साक्ष देत आहे.आता बघने औचित्यपूर्ण राहील की केज नगरपंचायत जागा(रिकामा प्लॉट)स्वर्गीय श्रीकांत शेटे यांच्या नावावर दस्त नोंदणी करते का त्याचा मुलगा सचिन शेटे?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!