केज जवळ उमरी फाट्यावर भीषण अपघात : रस्ता ओलांडणारी महिला जागीच ठार !
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज (दि.२९) :- केज-बीड रोडवरील केज पासून अवघ्या काही अंतरावर एका भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या उमरी
फाट्यावर बीड येथील दवाखाण्यातून एका आजारी रुग्णाला घेऊन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कार क्र. (एम एच-४४/एस/१६४४) ने मंगळवारी दि.२९ रोजी रात्री ८:३० वा. सुमारास रस्ता वैजयंती शिंदे (रा. उमरी पाटी) या रस्ता ओलांडीत असताना त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत वैजयंती शिंदे या जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग साहेब, उमेश आघाव आणि राम भंडाने यांनी धाव घेत अपघातातील कार ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आली. तर मयत महिलेचे पार्थिव उत्तरीय तपासणी आणि शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालया केज येथे पाठवण्यात आले आहे.