मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषन,पत्रकार रोहन गंलाडे.
उपोषणाला भरघोस पाठींबा पंचक्रोशीतील नागरिक उपोषण स्थळी भेट देण्या साठी येऊ लागले, अनेक ग्रामपंचायतचा लेखी पाठींबा.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील युवक रोहन गलांडे पाटील यांनी केज तहसीलदार यांना निवेदन देऊन काल उपोषणाला सुरुवात सुरुवात केली व आज दि.११ सप्टेंबर रोजी उपोषणाचा तिसरा दिवस आहे.ग्रामपंचाय कार्यालय ,ढाकेफळ यांनी व महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना यांनी चिंचोली माळी,जाधव जवळा येथे उपोषणाला बसलेल्या रोहन गलांडे यांना निवेदनाद्वारे पाठींबा देण्यात आला तरी रोहन गलांडे यांनी असे म्हटले आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावुन मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषन करणार आहे असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की वरिल विषयास अनुसरुन केज तहसीलदार यांनी आज उपोषण स्थळी भेट देऊन आपल्या मागण्या शासना पंर्यत पोहोचवल जात्याल असे सांगण्यात आले. हे उपोषण मि आमच्या मराठा समाजाला जो पर्यंत न्याय मिळत नाही अथवा आरक्षण भेटत नाही तो पर्यंत चालू ठेवणार आहे. तरी सरकार मायबाप व प्रशासना ने या गोष्टीची दखल घेऊन सहकार्य करावे. हि माझ्या सर्व मराठा समाजाच्या वतीने कळकळीची नम्र विनंती आहे. उपोषण काळामध्ये जर मला व माझ्या कुटुंबाला काही कमीजास्त झाले तर याला पुर्णपणे सरकार मायबाप व प्रशासण जबाबदार राहिल असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे तरी प्रशासनाने उपोषनाची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात यावे अशी मागणी रोहन गलांडे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
