• Fri. Apr 24th, 2026

शेतकऱ्यांनाच्या बरबादीला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार  —राजू शेट्टी

Bybaba maske

Sep 30, 2023

शेतकऱ्यांनाच्या बरबादीला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार

                    —राजू शेट्टी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बरबाद होत आहे. तसेच विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहेत. असे सांगून सरकारने कांदा सोयाबीन व कापसाच्या भावामागे सरकारचे आयात धोरण व सोयाबीन पेंड आयात केली. याला सरकार सर्वस्वी जबाबदार असल्याचा घणाघात राजू शेट्टी यांनी केज येथील दुष्काळ आक्रोश मेळाव्यात बोलताना केले.

केज येथे दि. २९ सप्टेंबर केज येथील मुक्ताई लॉन्स येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळ आक्रोश मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, सरकार कोणतेही असले तरी जो पर्यंत शेतकरी संघटित होऊन मागण्या पदरात पाडून घेत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनाचे भले होणार नाही. पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी कांद्याचे भाव निचांकी झाले. त्याला सरकारचे कांदा, कापूस, ऊस, सोयाबीन या पिकांचे भाव कमी होण्याला सरकारने चुकीचे कारणीभूत आहे तसेच शेतकऱ्यांच्या विम्याच्या पैशावर आणि सरकारी तिजोरीवर विमा कंपन्या डल्ला मारीत आहेत यालाही सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. कारण आता संकरित पिकांचा कालावधी कमी झालेला असून सलग २१ दिवसा ऐवजी १५ दिवसांचा खंड पडला तर दुष्काळ जाहीर करण्याचे नियम करायला हवेत.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा ध्यक्ष रवींद्र इंगळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याध्यक्ष अनिल रांजणकर, अशोक गित्ते, भागवत पवार, उच्चाधिकार समितीचे प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, संदीप जगताप, मराठवाडा अध्यक्ष बंगाळे पाटील, दामू अण्णा इंगोले, प्रशांत डिक्कर, किशोर ढगे, राजू गायके, दिनकर रिंगणे हे उपस्थित होते या मेळाव्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून कर्ज मुक्ती करावी. शेतकऱ्यांना एक लाख रु मदत घ्यावी. कांदा उत्पादक शेकऱ्यांना अनुदान देण्यात यावे. कऱ्यांना मोफत वीज द्यावी. १००% पीक विमा मंजूर करण्यात यावा. एफ आर पी पेक्षा २०० रु दराने उसाला जादा भाव देण्यात यावा. साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करावेत. लम्पि आजाराने पशुधन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे. अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रास्ताविक आदित्य रांजनकर यानी तर संचलन हनुमंत घाडगे सर यांनी केले.

चौकट :- 

शेंगा नसलेले सोयाबीनच्या पेंढीने केले स्वागत ! :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे स्वागत हार किंवा पुष्पगुच्छ देऊन न करता. या भागातील पिके पावसा अभावी हातची गेली आहेत. हे कळावे म्हणून शेंगा नसलेली सोयाबीच्या पेंढी देऊन करण्यात आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!