• Fri. Apr 24th, 2026

आयपीएस पंकज कुमावत यांची दंबग कारवाई  गुटखा माफियाला सापळा रचुन शिताफिने घेतले ताब्यात. 

Bybaba maske

Nov 29, 2023

 आयपीएस पंकज कुमावत यांची दंबग कारवाई 

गुटखा माफियाला सापळा रचुन शिताफिने घेतले ताब्यात 

रोखठोक न्युज वार्ताहर 

महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याची बे.कायदेशिर विक्री व वहातुक करणारा बीड जिल्हा पोलीसांना चकमा देणारा फरार गुटखा माफिया महारुद्रा ऊर्फ आबा नारायण मुळे, रा. बीड यास अपर पोलीस अधिक्षक, श्री. पंकज कुमावत यांनी घेतले ताब्यात

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अपर पोलीस अधिक्षक, श्री. पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे दिंद्रुड गु.र.नं. २०५/२३, पोलीस ठाणे सिरसाळा२२१/२०२३,२२२/२०२३, पोलीस ठाणे नेकनुर गु.र.नं. २८०/२०२३, २८९/२०२३, पोलीस ठाणे धारुर गु.र.नं. ३०४/२०२३ या गुन्हयात तसेच बीड जिल्हयातील पोलीस स्टेशनमधील ब-याच गुन्हयात फरार आरोपी नामे महारुद्रा ऊर्फ आबा नारायण मुळे, रा. बीड हा बऱ्याच दिवसापासुन पोलीसांना चकमा देवुन फरार असलेला आरोपी हा केज येथे आल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी सदर अरोपीस ताब्यात घेणे बाबत पो उप निरीक्षक राजेश पाटील , शमीम पाशा, त्रिंबक सोपने व पुजा माके यांना आदेशित केल्याने सदर पथक सापळा रचुन शासकीय विश्रामगृह केज समोर दबा धरुन थांबले असता, यातील आरोपी नामे महारुद्रा मुळे ऊर्फ आबा मुळे आला व पोलीस पथकास पाहताच जोरात पळुण जात असतांना पो उप निरीक्षक राजेश पाटील साहेब, शमीम पाशा, त्रिंबक सोपने व पुजा माके यांनी त्यांचा पाठलाग

करुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कारवाई श्री.नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री.पंकज कुमावत साहेब यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार शमीम पाशा, त्रिंबक सोपने, पुजा माके यांचे टिमने यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!