नेत्यांचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या माथी का? डाॅ. सुरेश साबळे यांचे निलंबन!
डॉ. साबळेंच्या निलंबनाच्या घोषणेने जिल्ह्यात संताप
रोखठोक न्युज वार्ताहर
जिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी रुग्णालयाचा कायापालट करत गोरगरिबांना जिल्हा रुग्णालयात चांगले उपचार मिळावेत यासाठी दिवस रात्र काम केले,असे डाॅ. सुरेश साबळे यांचे आज ता. ०३ अधिवेशनामध्ये निलंबन करण्यात आलं. मुळात ज्या भरतीमध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांचा काडीमात्र संबंध नसताना, त्या गैरकारभारामध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांना अडकवण्याचा हा प्रयत्न असून या कारवाईच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव या ठिकाणी झालेल्या भरती मध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा प्रश्न आज अधिवेशनामध्ये आ. पडळकर यांनी मांडल्यानंतर याची सखोल चौकशी करून नंतर कारवाई करण अपेक्षित होतं, परंतु याची कोणती चौकशी न करता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तडका फडकी डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. विशेष म्हणजे लोखंडी सावरगाव या ठिकाणी झालेल्या भरती घोटाळ्यामध्ये डॉक्टर सुरेश साबळे यांचा काडीमात्र ही संबंध नाही. विशेष म्हणजे ही भरती एका कंपनीने केली असून सर्व प्रक्रिया याच कंपनीने राबवली आहे. यामुळे यात जर गैरप्रकार झाला असेल तर या कंपनी विरोधात गुन्हे नोंद करणे अपेक्षित असताना सुद्धा नेत्यांचा गैर कारभार अधिकाऱ्यांच्या माथी मारल्यासारखं आजची ही कारवाई आहे. यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेली घोषणा त्यांनी वापस घ्यावी व जिल्हा रुग्णालयाला डॉक्टर सुरेश साबळे सारखा अधिकारी कायम ठेवावा अशी मागणी होत आहे.
डॉ. साबळेंच्या निलंबनाच्या घोषणेने जिल्ह्यात संताप
सरकारने कंत्राट दिलेल्या कंपनीने बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगावच्या रुग्णालयातील भरतीची सूत्रे पुढाऱ्यांकडे दिली, त्यासाठी मोठ्याप्रमाणावर माया जमविल्याची चर्चाही झाली आणि या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी कारवाई मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांवर केली. लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयातील भरती गैरव्यवहार प्रकरणात बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा विधानपरिषदेत करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या घोषणेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात बाह्यस्त्रोतांमार्फत भरती करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने नाशिक येथील कंपनीला कंत्राट दिले आहे. आता जिल्ह्यात या कंपनीने काही पुढाऱ्यांच्या हाती भरतीची सूत्रे दिली आणि त्यांनी प्रत्येक पदासाठी मोठ्याप्रमाणावर बोली लावल्याची चर्चा आहे. तशा तक्रारी देखील झाल्या. याच संदर्भात विधानपरिषदेत प्रश्न विचारला गेला आणि याला उत्तर देताना सरकारने बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बीड जिल्ह्यात मात्र संताप व्यक्त होत आहे.
मुळात बाह्यस्त्रोतांमार्फत पद भरती करण्याचा निर्णय सरकारचा. कंपनी नियुक्त करणारे देखील सरकारच . पदे त्या कंपनीने भरायची आणि कंपनी ज्याला पाठविलं त्यांना अधिकाऱ्यांनी रुजू करून घ्यायचे असा हा नियम. आता कंपनीचे लोक भरती करताना कोणाकडून काय घेतात याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना असण्याचे कारण नाही, किंवा कंपनीच्या नावावर कोणी वसुली केली तर त्याची जबाबदारी कंपनीने घ्यायला हवी. मात्र कंपनीवर आणि कंपनीच्या नावावर माया गोळा करणारांवर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही, त्यामुळे या साऱ्या प्रकरणात कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सकांचा बळी दिला जात असल्याची भावना जिल्ह्यात आहे. सरकारच्या या अजब घोषणेबद्दल जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. करायचे कोणी आणि भरायचे कोणी असला उरफाटा न्याय सरकार का लावीत आहे ? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.