• Fri. Apr 24th, 2026

मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या सह सहा अधिकाऱ्यांने केला केज नगरपंचायतला रामराम. अधिकाऱ्यांच बदली करून जाण्यामागच कारण कळेना? मुख्याधिकारी 20 लाखाच्या न केलेल्या रस्त्याच टेंडर करणार होते रद्द.

Bybaba maske

Dec 6, 2023

मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या सह सहा अधिकाऱ्यांने केला केज नगरपंचायतला रामराम.

अधिकाऱ्यांच बदली करून जाण्यामागच कारण कळेना?

मुख्याधिकारी 20 लाखाच्या न केलेल्या रस्त्याच टेंडर करणार होते रद्द.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची किल्लेधारूर येथे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली असून, ४ डिसेंबर रोजी नगरविकास विभागाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गायकवाड यांना मुख्याधिकारी या पदाचा चार्ज घेऊन एक वर्ष सुद्धा झाले नव्हते.तेवढ्या काळात त्यांची बदली झाल्याने अश्चर्य व्यक्त केले जात होते.ते खमके अधिकारी असल्याने गैर कारभार करायची गुंजाईश नव्हती मग अचानक बदली कशी झाली? या आगोदर पाणी पुरवठ्याचे अभियंता काळे,नगररचनाकार पोटे,बांधकामचे सिरसट ,इलेक्ट्रिक चे राऊत अधिक्षक आयुब पठाण.यांनी आपल्या बद्लीच्या कालावधी संपण्याच्या आत बदल्या करून घेतल्या आहेत आता केज नगरपंचायत मध्ये अधिकाऱ्यांचा दुष्काळ आहे.नवीन कोणी येण्या साठी तयार नाहीत तर जुने जिमेद्दारी घेण्यास कचरत आहेत.असे का होत आहे याची सत्ताधारी व सर्वेसर्वाने विचार करणे गरजेच आहे.कारण केज शहरातील नागरीकांचे कामे खोंळबनार आहेत.गेल्या दोन वर्षांपासून वार्ड क्रमांक आठ मधील 20 लक्ष रूपायाचा रस्ता न करताच गुत्तेदार फरार आहे.ते काम रद्द करण्याच्या प्रयत्नात असताना मुख्यधिकारी गायकवाड यांची बदली झाल्याने केज शहरात उलट सुलट चर्चा नागरिक करत आहेत.तसेच 76 कोटीच्या नगरोत्थानाच्या कामतील नाहरकत प्रमाणपत्र हे सुद्धा विवादास्पद मुद्दा आहे.*

गायकवाड यांनी केज शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे किल्ले धारूर येथील नगर परिषदेचा अतिरिक्त कारभार असताना त्यांची केज येथून साडेआठ महिन्याच्या सेवेनंतर प्रशासकीय कारणास्तव बदली झाली आहे. सध्या येथील नगरपंचायतीमधील अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!