नगराध्यक्ष महिला असताना,महिलांची होतेय कुचंबणा.सार्वजनीक स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय.सामाजीक कार्यकर्त्येचेअंदोलन,पत्रकारांच्या बातमीचा यांच्या वर काहीच परिणाम होत नाही.
नगराध्यक्ष महिला असताना,महिलांची होतेय कुचंबणा.सार्वजनीक स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय.
सामाजीक कार्यकर्त्येचेअंदोलन,पत्रकारांच्या बातमीचा यांच्या वर काहीच परिणाम होत नाही.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज येथे भरणाऱ्या आठवडी बाजराच्या परिसरात सार्वजनीक स्वच्छतागृहाची सोय नसल्याने विक्रेत्यांसह नागरीकांची गैरसोय होत आहे. बाजारात बसरणाऱ्या विक्रेत्याकडून नगरपंचायत कर वसूल करुनही त्यांना सोयी सुवीद्या पुरवीत नसल्याने नागरीकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विषेश म्हणजे नगरपंचायतचे नगराध्यक्ष ह्या एक महिला असताना त्यांना महिलांच्या त्रासाची कल्पना नसने हि महिला बाबतची घोर संतापजनक आणि कर्तव्य शुन्य भावना असल्याच बोलले जाते.जर आपल्या महिला भगिनीच्यां समस्या जर आपल्याला कळत नसतील तर याला काय समजावे?सामाजीक कार्यकर्त्येचेअंदोलन,पत्रकारांच्या बातमीचा यांच्या वर काहीच परिणाम होत नाही.
केज येथे दर मंगळवार व शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. आजूबाजूच्या खेड्यांना मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीक बाजारात येतात त्यामध्ये महिलांची मोठी संख्या असते. मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणाहून येणारे जाणारे नागरीक ही भाजीपाला घेण्यासाठी थांबतात. भाजीपाला ताजा मिळत असल्याने नागरीकांची मोठी गर्दी होते. बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांना व ग्राहकांना याठिकाणी कसल्याही सुवीद्या नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. बाजार परिसरात एकही सार्वजनीक स्वच्छतागृह नसल्याने साधे लघुशंकेसाठी कोठे जावे अशा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. पाऊसात,उन्हात ना ओटे आहेत ना अन्य सुविधा त्यांना जमिनीवर बसून भाजीपाला विक्री करावा लागतो. त्याठिकाणी बसण्यासाठी सोय नसल्याने विक्रत्यांची गैरसोय होतांना दिसते. बाजार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारात पडलेला कचरा व खराब भाज्या उचलल्या जात नसल्याने परीसरात दुर्गंधी पसरल्याने आजू बाजूला राहणाऱ्या नागरीक व तेथील दुकानदारांना घाण वासाचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजार बसणाऱ्या विक्रेत्याकडून नगरपंचायत कर वसूल करते परंतू त्यांना सुविधा दिल्या जात नसल्याने विक्रत्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. बाजारा सार्वजनीक स्वच्छतागृहा बरोबरच इतर सुवीद्या पुरवाव्यात अशी मागणी नागरीकांतून व महिला भाजीपाला विक्रेत्याकडून होत आहे.