• Fri. Apr 24th, 2026

डीसीसी बँकेच्या माजी उपाध्यक्षांना मारहाण करून दोन लाख लुटले.

Bybaba maske

Dec 3, 2023

डीसीसी बँकेच्या माजी उपाध्यक्षांना मारहाण करून दोन लाख लुटले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 तालुक्यातील गावंदरा येथे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुदामराव बडे यांना मारहाण करून चोरट्यांनी दोन लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुदामराव बडे बडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले, एकाच रात्रीत तालुक्यात तीन ठिकाणी चोरट्यांनी डाव साधल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तालुक्यातील गावंदरा येथे मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बडे यांच्या घरी तीन चोरट्यांनी प्रवेश करत

कपाट तोडून सोने चोरी केले. ही घटना लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे एका चोरट्याने त्याच्या तोंडावर दगड मारला. यात ते जखमी झाले.

तसेच रस्त्यावरच असलेल्या तुकाराम घुले यांच्या घरीदेखील चोरट्यांनी डाव साधत घरातील १० हजार रुपयांची रोकड व साहित्य चोरले. याप्रकरणी धारूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवरगाव शिवारात विद्युत मोटारींची चोरी

तालुक्यातील आवरगाव येथे १ डिसेंबर रोजी रात्री उशीरा पाच ते सहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना घडली आहे. वारंवार होत असलेल्या चोरीच्या प्रकाराने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आवरगावचे सरपंच अमोल जगताप यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!