• Fri. Apr 24th, 2026

ऊसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा जागीच मृत्यू.

Bybaba maske

Dec 1, 2023

ऊसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा जागीच मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्या नजीक दुचाकीची उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसली त्यात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (दि ३०) गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली.पांडूरंग भिमराव भालेकर (वय ४३ रा. तांदूळवाडी ता कळंब) व विठ्ठल उत्तम कस्पटे (वय ४० रा. इटकूर ता कळंब) अशी मयतांची नावे आहेत. हे दोघे नात्याने मेहुणे होते ते काही कामानिमित्त केज तालुक्यात आले होते.

रात्रीच्या सुमारास एकाच दुचाकीवरून कळंब मार्गे आपल्या गावी परत जात होते. त्यावेळी सुर्डी फाट्यानजीक पुढे चालत असलेल्या ऊस ट्रॅक्टरच्या वेगाचा अंधारात अंदाज न आल्याने पाठीमागून ट्रॉलीला जोराची धडक बसली. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रस्त्यावर मोठा प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे दोघांनाही जागीच प्राण गमवावे लागले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णवाहिकेने कळंब च्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. युसुफवडगाव पोलिसांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!