पाच मामांनी दगडाने ठेचून केला भाच्याचा खून.अंबाजोगाई येथील खुनाचा झाला उलगडा.
रोखठोक न्युज वार्ताहर
आपसातील जागेच्या वादातून उद्भवलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच मामांनी एकत्रित येऊन
भाच्याचा दगडाने ठेचून व काठ्याणी मारहाण करून खून केला.हा प्रकार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ मोंढा रोडवर शुक्रवारी (दि.०८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
राजेंद्रची पत्नी आशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, राजेंद्रची आई अंबाजोगाई येथील असून त्यांना राम माणिकराव लाड (पवार), लक्ष्मण माणिकराव लाड (पवार), भरत माणिकराव लाड (पवार), बजरंग माणिकराव लाड (पवार) आणि शत्रुघ्न माणिकराव लाड (पवार) असे पाच भाऊ आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ मुख्य रस्ताय्वर वडीलोपार्जीत प्लॉट असुन त्यामध्ये बजरंगचे ज्युसबारचे दुकान, रामचे पंक्चरचे दुकान, भरतचे वेल्डींगचे दुकान, शत्रुघ्नचे पंक्चरचे दुकान असून लक्ष्मणला दुकानाची जागा दिलेली नाही. त्याच्या बदल्यात लक्ष्मणला पाठीमागे असलेली घराची जागा दिलेली आहे. तो त्याच्या कुटुंबासह राहतो व राम पण त्याच ठिकाणी राहतो. मागील एक वर्षापासून वडीलोपार्जित जागेत व दुकानामध्ये आई छाया कळसे यांना जागेतील हिस्सा मिळावा म्हणुन राजेंद्र मामांना दुकान व जागेत हिस्सा मागत होते. त्यावरून राजेंद्रचे मामांसोबत मागील वर्षभरात अनेकदा वादविवाद होऊन भांडणे झालेले होते.
शुक्रवारी (दि.०८) राजेंद्र हे त्यांचा मोटार सायकलवर बाहेर जाऊन येतो म्हणुन साडे आठ ते नऊ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वैभव ज्युसबारचे समोर राजेंद्र कळसे हा असतानाच त्याचे मामा राम माणिकराव लाड – पवार, लक्ष्मण माणिकराव लाड – पवार, भारत माणिकराव लाड – पवार, बजरंग माणिकराव लाड – पवार, शत्रुघ्न माणिकराव लाड – पवार, या पाच जणांनी एकत्रित येऊन दगडाने ठेचून व काठीने मारहाण करून त्याचे डोके फोडले. या हल्ल्यात राजेंद्र जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. उपस्थित जनसमुदायाने त्यांना उपचारासाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दखल केले.मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रकरणी राजेंद्र कळसे याची पत्नी आशा राजेंद्र कळसे हिच्या फिर्यादी वरून पाच जणांविरुद्ध कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी या प्रकरणी भारत माणिकराव लाड – पवार यास अटक केली आहे.या प्रकरणाचा पोलीस तपास पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जाधवर करीत आहेत. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
