लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती गावागावात शहरात साजरी होणार-मा.आ. पंकजाताई मुंडे
रोखठोक न्युज वार्ताहर
आदरणीय, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती दरवर्षी गोपीनाथ गड, या ठिकाणी मोठया उत्साहात अठरापगड जमातीचा लाखो चा समुदाय गोळा होऊन साजरा करण्यात येत असतो, पण या वर्षी मुंडे साहेबांची जयंती, शहरा, शहरात, खेडोपाडी, तळागाळात, आपल्या लाडक्या नेत्याची जयंती साजरी होणार आहे, या दिवशी गोपीनाथगडावर मोठ्या संख्येने मुंडे साहेबांवर प्रेम करणारा महाराष्ट्रातला सर्व जाती धर्मातील जनतेचा जनसागर उसळला
जात असतो, पण या व मागच्या वर्षीपासून आम्ही थोडा बदल करण्यात आला आहे, हा जयंतीचा कार्यक्रम गोपीनाथ गड हा गावागावात न्यावा, आणि मुंडे साहेबांची जयंती ही गावागावात आपापल्या ठिकाणी लोकांना साजरी करता यावी म्हणून आम्ही वेग वेगळ्या कार्यक्रम करणार आहोत,मी १२ तारखेला सकाळी सर्वांना हे आवाहन केले आहे की या वर्षी कार्यक्रम आप आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी करावे, तर प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रम लावले गेले आहेत, अगदी कुस्ती पासून ते क्रिकेट स्पर्धेपासून ते रक्तदानाच्या शिबिरापर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, असे मा, आ, पंकजाताई मुंडे यांनी सर्व जनतेला संबोधित केले आहे,
