उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक, पावणे दोन लाखांची झाडे जप्त
रोखठोक न्युज वार्ताहर
तालुक्यातील टाकळी शिवारात उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी छापा मारून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ३५ किलो गांजा जप्त केला.
टाकळी येथील सोपान महादेव घुले याने उसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. पोलिस पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला असता उसात ८ फुटांपर्यंत वाढलेली गांजाची ९ झाडे आढळून आली. झाडे उपटून वजन केल्यानंतर ३५ किलो वजन भरले. पोना सुधाकर दौंड यांच्या फिर्यादीवरून सोपान घुले याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. राजेश पाटील, फारोक कादरी, जमादार राजू वंजारे, पोलिस नाईक सुधाकर दौंड, प्रकाश मुंडे, शहादेव म्हेत्रे, मतीन शेख यांनी केली.