• Tue. Jun 23rd, 2026

25 प्रवाशांनी भरलेल्या धावत्या शिवशाही बसला भीषण आग.

Bybaba maske

Dec 10, 2023

25 प्रवाशांनी भरलेल्या धावत्या शिवशाही बसला भीषण आग.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 सध्या नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये एका धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या बसमधून तब्बल 25 प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस ने पेट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर प्रवासी खाली उतरताच काही मिनिटातच संपूर्ण बसने पेट घेतला आणि काही क्षणातच बस संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा या ठिकाणी ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बसला आग लागल्याची माहिती समजताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. बसला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

baba maske

Related Post

भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!