• Mon. Apr 20th, 2026

बॅनरचे हे विद्रूपीकरण कोणी थांबवेल का?  पंचायत समितीला बॅनर चा विळखा.विधुत खांबाला उभे बॅनर ने अपघात संख्या वाढले.

Bybaba maske

Dec 20, 2023

बॅनरचे हे विद्रूपीकरण कोणी थांबवेल का? 

पंचायत समितीला बॅनर चा विळखा.विधुत खांबाला उभे बॅनर ने अपघात संख्या वाढले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

नेत्यांचा वाढदिवस आणि व्यवसायाचा शुभारंभ असला की केज मध्ये जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.पंचायत समिती कोठे आहे हे शोधावी लागते.बरी ही जागा सार्वजनिक विभागाची पण एक बॅनर आठ दिवस ठेवण्या साठी हे तिराईत लोक भाडे वसूल करतात.शहरात जागोगाजी मोठ्या आकाराचे तसेच उभे बॅनर लावून चमकोगिरी केली जाते. यात नेत्यांसोबतच कार्यकत्यांचे एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे फोटोही असतात. शहरातील रहदारीचे कॉर्नर असो किंवा मोक्याची मोकळी जागा हेरुन बॅनर, होडींग लावले जातात. नेता किंवा मित्राचा वाढदिवस किंवा एखाद्याचा स्मृतिदिन किंवा दुकान, शोरूमचे उ‌द्घाटनाचे होडींग लावण्याची जणूकाही स्पर्धा चालली आहे.अश्या ह्या बॅनरबाजी मुळे केज शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. यातच गंभीर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे, लोकप्रक्षोभ झाल्यानंतर हे बॅनर, होडींग काढले. परंतु यातून कोणीही बोध घेतल्याचे दिसत नाही. काही दिवसांतच प्रसंगानुरूप बॅनर, होडींग झळकत आहेत. जागा कमी पडली म्हणून विद्युत खांबाला उभे बॅनर लावले जात असल्याने वाहनधारकांनाही काळजीने वाहन चालवावे लागते. बॅनरबाजीवर नियंत्रणाचे काम नगरपंचायतचे असताना विनापरवानगी बॅनरबाजीने उत आला आहे. बॅनर काढण्याची हिमत यंत्रणेत दिसून येत नाही. त्यामुळे बॅनरने पुन्हा डोके वर काढले राव… अशी कुजबुज होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!