• Fri. Apr 24th, 2026

खा.रजनीताई पाटील यांची स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड!रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

Bybaba maske

Jan 6, 2024

खा.रजनीताई पाटील यांची स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड!

रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

रोखठोक न्युज 

केज दि.५(प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस समितीद्वारे आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी सुरू झाल्या आहेत. 

              आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, दमन – दीव आणि दादरा नगर हवेली या राज्यासाठी नुकतीच स्क्रीनिंग कमिटी निवडण्यात आली असून पक्ष अध्यक्ष व पक्ष नेतृत्व यांनी राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील याची या समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून आता सबंधित राज्यात आता लोकसभेच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार असून पक्षातील ही मोठी जबाबदारी असणारी समिती असल्याने या निमित्ताने पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने रजनीताई पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!