• Fri. Apr 24th, 2026

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे डाॅ.भाऊ विठ्ठल क्षीरसागर यांना 57 लांखाचा ऑनलाइन गंडा.

Bybaba maske

Jan 7, 2024

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे डाॅ.भाऊ विठ्ठल क्षीरसागर यांना 57 लांखाचा ऑनलाइन गंडा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सोशल साईटच्या विविध लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशाच फसवणुकीला माजी मंत्र्यांचे बंधू तथा बीड येथील केसोना एक्सीडेंट हॉस्पिटलचे डॉ. विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांची फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवण्याच्या आमिषातून 57 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झालीआहे.याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

                बीडच्या माजी मंत्र्यांचे बंधू डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांनी नोव्हेंबर मध्ये सोशल मार्केटिंग साईट पहात असतांना एका साईटवर रिप्लाय दिला. रिप्लाय देताच समोरच्या व्यक्तीने क्षीरसागर यांना टेलीग्राम आयडी दिला व त्यावर बोलण्यास सांगितले. अर्पिता मोनिका रा.बेंगलोर हिच्याशी त्यांचे मेसेज वर बोलणे झाले. यावेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न डॉ. क्षीरसागर यांना केला. त्याला क्षीरसागर यांनी संमती दिली.त्यानंतर अर्पिता मोनिका हिने पाठवलेल्या लिंक वर त्यांनी सर्व वैयक्तिक माहिती भरली. 10 नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी 40 हजार रूपये गुंतवणूक केली. या गुंतवणूक केलेल्या रकमेचे अवघ्या पाच दिवसातच 45 हजार दोनशे रुपये नफ्यासह परतावा मिळाला. परतावा पाहून खुश झालेल्या क्षीरसागर यांनी वेगवेगळ्या दिवशी आणखी पैशांची गुंतवणूक केली.57 लाख 20 हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला 36 लाख रूपये टॅक्स बसला असल्याचे सांगण्यात आले व तो भरावा असे देखील सांगितले गेले.मात्र डॉ. क्षीरसागर यांनी टॅक्स चे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान डॉ.विठ्ठल क्षीरसागर यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!