• Wed. Jun 3rd, 2026

सांगवी ते बेलगाव रस्त्याचे निकृष्ठ व अपूर्ण काम प्रवीण कंट्रक्शनने तात्काळ करावे.5 कोटी 48 लाखाचा रस्ता केला तो ही निकृष्ठ?मतदारसंघात आलेला कोट्यावधी निधी गुत्तेदार पोसण्या साठी आहे का?

Bybaba maske

Jan 10, 2024

सांगवी ते बेलगाव रस्त्याचे निकृष्ठ व अपूर्ण काम प्रवीण कंट्रक्शनने तात्काळ करावे.

5 कोटी 48 लाखाचा रस्ता केला तो ही निकृष्ठ?

मतदारसंघात आलेला कोट्यावधी निधी गुत्तेदार पोसण्या साठी आहे का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील सांगवी ते बेलगाव या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मस्साजोग-सांगवी-बेलगाव असा रस्ता 5 कोटी 48 लाखा रूपयाचे झाले असून या रस्त्याचे अपुर्ण व निकृष्ठ कामाचे लोकार्पण खासदार प्रितमताई मुंढे यांच्या हस्ते गेल्या महिन्यात पार पडले.रात्रीच्या आंधारात खासदार ताई यांच्या कडून लोकार्पण सोहळा केला पण उजेडात या रस्त्याची निकृष्ठ ता, दिसून येते पण प्रवीण कंट्रक्शन ला त्याचे सोयरसुतक नाही कारण लोकार्पण सोहळा पार पडल्या नंतर त्या गावातील रहिवाशांकडून व पत्रकार बांधवान कडून या वर आवाज उठला होतो पत्रकारांनी दैनिकात निकृष्ठ रस्त्याचे फोटो व बातमी प्रकाशित केली होती पण गुत्तेदाराच्या कान व डोळ्या पंर्यत पोहचंली नाही.यात प्रवीण कंट्रक्शन ला “सब माल अंदर” करायचा आहे का हा प्रश्न आहे.मतदारसंघात आलेला कोट्यावधी निधी गुत्तेदार पोसण्या साठी आहे का? कारण मतदारसंघात आलेल्या निधीतून निकृष्ठ दर्जाचे कामे होत आहेत व लोकप्रतिनिधींकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.किंवा प्रशासन यात कारवाई करत. त्यामुळेच दिनांक 9/1/2024 रोजी बेलगावच्या रहिवाशांकडून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.त्यात मौजे सांगवी ते बेलगाव रस्त्याचे काम निकृष्ठ झाले असून हनुमान मंदिर ते पुला पंर्यत अर्धवट काम केले आहे तसेच शाळे समोर व चौरे वस्ती येथील काम करावे असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर बेलगावचे नागरिक उमेश जालिंदर चौरे,घुले तुळशीराम विठ्ठल, घुले प्रेमचंद,घुले पोपट,भांगे गोरख,घुले मनोहर,भांगे फुलचंद,भांगे भालचंद्र.याच्या स्वाक्षरी आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!