• Mon. May 25th, 2026

चला बसू!!! जिल्ह्यात कुठे ही चिअर्स करा,कुणाची भीती नाही.

Bybaba maske

Jan 11, 2024

चला बसू!!!

जिल्ह्यात कुठे ही चिअर्स करा,कुणाची भीती नाही.

संपादक बाबासाहेब मस्के  

बीड जिल्ह्यातील स्थिती खुप बिघडली असल्याची परिस्थिती तुन जाणवत आहे.शहरातील रस्त्यांवर दारू विक्रीचे दुकाने थाटले आहेत.शहरातील व तालुक्यातील प्रत्येक धाब्यावर अवैध दारू विकली जात आहे.या कडे शहरातील पोलीस प्रशासनाचे तर तालुक्यातील नेमलेल्या प्रत्येक बीट अंमलदाराचे दुर्लक्ष दिसून येत आहे.या मध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची नागरिकांची भावना आहे.तरुण पिढी यात बरबाद होत आहे.कुठल्याही गावात” चल बसू” ऐवढेच म्हणायची गरज तर तिथे किराणा दुकान,धाबा येथे सरास दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे.या धाबा संस्कृती मुळे येणारे नवीन पिढी त्यांचे भविष्य उद्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे.मिसरूड फुटलेले मुले.तोंडात गुटखा,तंबाखूचा तोबरा,तर हात सिगारेट व दारूचा ग्लास,ऐवढेच नाहीतर नशेच्या गोळ्या,फेव्हिकाॅलची नशा,झोपेच्या गोळ्यांची नशा, खोकल्याच्या औषधाची नशा हा तरुण वर्ग करतोय.या अवस्थेत हा तरुण आपल्या समोर येतो याची लाज कोणी बाळगायची ? सगळा ओढा चैन करण्या कडे,मग चैनीला पैसे नाही मिळाले कि चोरी-चपाटी,फसवणूक,मोबाईल चोर,दोनचाकी,चारचाकी चोरी कडे तरुण वळले आहेत, गुंडगिरी कडे वळत आहेत.याचे जिमेद्दार कोण याचा विचार करण्याची गरज आहे.सर्व आपण आई-वडीलांच्या संस्कारांवर खापर फोडून मोकळे होतो. पण अवैध धंदे जसे गावठी दारू,गुटखा,प्रत्येक धाब्यावर मिळणारी दारूचे रोखणे ही सुद्धा एक जिमेद्दारीच आहे.ती आपण कशी निभावतो  यावर तरुण पिढीच भविष्य आहे.मी कसा आयएस झालो,आयपीएस झालो यांचे उदात्तीकरण पुस्तकातून,वर्तमानपत्रातून होते पण ज्यावेळेस हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची वेळ येत त्यावेळेस “हाताची घडी तोंडावर बोट” ऐवढच होते.सगळ्या आयपीएस, आयएस याना नावे ठेवता येणार नाही.कारण या पैकी जाण कर्तव्य आणि देशभक्ती असलेले,किती तरी आधिकारी आहेत ज्यांचे नाव आज ही सन्मानाने घेतले जाते.आज आपल्या व या पोलीस प्रशासन च्या हातात आहे कुठे नेहून ठेवायचा आहे महाराष्ट्र.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!