• Sat. Apr 18th, 2026

मोबाईल चोर,गाडी चोराना,लुटणारी टोळी शहरात सक्रिय.  

Bybaba maske

Jan 12, 2024

मोबाईल चोर,गाडी चोराना,लुटणारी टोळी शहरात सक्रिय.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात एक अजब घटना पाहिला मिळाली, टूव्हिलर  गाडी चोरताना एक व्यक्तीस  काही टोळक्याने पकडले त्याला झापड झूपड मारून दरडावले त्या चोराला रंगेहाथ पकडल्या मुळे तो अगोदरच गर्भगळित झाला होता मग ह्या टोळक्याने त्याला पोलीसाच्या हवाली करण्याच्या बहाण्याने कार मध्ये बसवले.तो चोर ही पब्लिक मारेल म्हणून कार मध्ये बसला.पण त्या चोराला पोलीस ठाण्यात न घेऊन जाता त्याला दुसरी कडेच घेऊन गेले.त्यानंतर त्याला धु धु धुतले व त्याच्या कडे पैश्याची मागणी करू लागले,त्याने नकार देताच त्याला खूप मारले व सोडून दिले.त्यानंतर तो चोरच पोलीस ठाण्यात आला त्या टोळक्या विरोधात तक्रार देण्या साठी,या टोळक्याने माझा मोबाईल व पैसे काढून घेतली अशी तक्रार करण्या साठी.पण पोलीस ठाण्यात आल्याची बातमी कळताच सेटलमेंट साठी काही केज शहरातील तरुण चोराच्या बाजूने पोलीस ठाण्या बाहेर हजर झाले तेवढ्यात ते टोळके ही तिथे आले व सेटलमेंट होऊन प्रकरण मिटले…पण रोखठोक न्युज ने अधिक माहिती घेतली असता असे समजले की शहरात अश्या घटना सारख्या होतात.शहरात दोन आठवडी बाजार असतात.त्या दिवशी किंवा इतर दिवशी ज्या वेळेस हे बाहेर गावचे मोबाईल चोर,गाड्याचोर  येतात,त्यावेळेस  शहरातील एक टोळके यांच्यावर लक्ष ठेवून असतात.या चोरांनी चोरी केली रे केली की हे टोळके त्याना पकडतात व हाणामारी करतात व त्याला प्रचंड घाबरून टाकतात त्या नंतर त्याला पोलीसांच्या हवाली करायच्या बहाण्याने गाडीत बसवतात व त्याला अज्ञात स्थळी घेऊन जातात व त्याला खूप मारतात.मग चालु होते सेटलमेंट मग हा चोर आपल्या म्होरक्याला संपर्क साधतो तो तिथे बसून सेटलमेंट करतो यांनी मागितलेल्या डिमांड नुसार यांची सेटलमेंट रक्कम यांच्या फोनपे, गुगल पे वर पाठवली जाते मग याला सोडले जाते.जर हा मोबाईल चोर असेल तर त्यांने दोन मोबाईल चोरले तर एक हे ठेवून घेतात.असा गोरख धंदा किती तरी वर्षांपासून होत आहे.हे चोर शहरात येण्या आधीच यांना सगळी माहिती असते कोण येणार,कुठे थांबनार याची यथोचित माहिती असते जे की पोलीसांना सुद्धा नसते.तसेच जर कुठली दुचाकी चोरीला गेली तर ती कोणी चोरली कुठे आहे हे सगळ यांना माहित असते.जर यांच्या बरोबर सेटलमेंट केली तर गाडीच्या बदल्यात 5/10 हजार रूपये दिले तर त्या चोरान कडून हे चोरीला गेलेली गाडी सुद्धा मिळवून देतात.

मग आहेत का नाहीत हे चोरावर मोर.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!