• Thu. Jun 4th, 2026

◼️परळी शहर हद्दीत फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू? ◼️पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरकनाथ दहिफळे साहेब यांची दबंग कामगिरी ◼️संभाजी नगर व परळी शहर पोलिसांची कारवाई ,संशयाखाली दोन महिला ताब्यात ?

Bybaba maske

Jan 12, 2024

◼️परळी शहर हद्दीत फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू?

◼️पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरकनाथ दहिफळे साहेब यांची दबंग कामगिरी

◼️संभाजी नगर व परळी शहर पोलिसांची कारवाई ,संशयाखाली दोन महिला ताब्यात ?

रोखठोक न्युज 

स्पा सेंटरच्या नावाखाली सूर असलेला गोरख धंदा पोलिसांच्यासतर्कतेमुळे उघड, परळी शहर व संभाजीनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी,

सविस्तर माहिती: परिसरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर महेश कॉम्प्लेक्स येथे राजरोसपणे फ्लोरा स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता अवैद्य धंदा, पडद्यामागून वेश्या व्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती परळी शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन ला मिळाली परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून हाकेच्या अंतरावर महेश कॉम्प्लेक्स या ठिकाणी, हा स्पा आणि पडदयामागे गोरख धंदा सुरू होता,

क्षणाचा ही विलंब न करता लागलीच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व परळी शहर पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक गोरकनाथ दहिफळे साहेब यांनी कर्मचार्‍यांसमवेत परळीतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या महेश कॉम्प्लेक्स येथे धाड टाकली, व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघड झाला.

फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असल्याची गुपित माहिती मिळाली असता संभाजी नगर परळी शहर पोलिसांनी त्या फ्लोरा स्पावर धाड टाकून कारवाई केली त्या ठिकाणी पुणे येथून आलेल्या दोन महिला यांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता शिवाजी चौकातील महेश कॉम्प्लेक्स हे मंचक मुंडे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे आणि दयानंद लिंबाजी गडदे हा इसम त्या ठिकाणी फ्लोरा स्पा चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे सदरील कारवाई संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चाऊस साहेब परळी शहर ठाण्याचे सपोनि दहिफळे ,महिला पोलिस अंमलदार यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती दिली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!