• Fri. Apr 24th, 2026

कंटेनर पिकअप च्या अपघातात 4 ठार.चार मृताची ओळख पटली.

Bybaba maske

Jan 12, 2024

कंटेनर पिकअप च्या अपघातात 4 ठार.

चार मृताची ओळख पटली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दि. 12 : येथुन जवळच असलेल्या ससेवाडी नजीक शुक्रवारी सायंकाळी कंटेनर आणि पिकअपची समोरा समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यु झाला असून घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती, या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले, त्यांनी गाड्यामधून मृतदेह बाहेर काढले, प्रल्हाद सीताराम घरत (रा.महाजनवाडी)

अपघातात 4ठार

बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी प्रल्हाद

सिताराम घरत वय ६३ वर्षे आणि त्यांचा मुलगा नितीन प्रल्हाद घरत वय ४१ वर्षे तर

पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील विनोद लक्ष्मण सानप वय ४० वर्षे हे अपघातात जागीच ठार झाले

 

आहेत…. कंटेनर मधील दोघे ठार झाले असल्याची माहिती

मिळाली आहे.. या अपघातात एकुण चार जनाचा   मृत्यु झाला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!