नापास नगरपंचायतच्या गलथान कारभाराने तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
नगरपंचायत मुख्याधिकारी उत्कृष गुट्टे लक्ष देतील का?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत हाद्दीत मंगळवार पेठेत आठवडी बाजार भरतो.केज तालुक्यातील जनते साठी हा बाजार खूप महत्त्वपूर्ण आहे.शहर आजूबाजूचे खेड्यांतून खरेदी करण्या साठी मोठ्या प्रमाणात नागरीक येत असतात.11 जानेवारी स्वच्छ सर्वेक्षणात केज नगरपंचायत नापास झाली आहे तसा रँक केज नगरपंचायत ला मिळाला आहे,तरी पण त्यात नगरपंचायत कुठलीही सुधारणा करत असल्याचे दिसून येत नाही.मंगळवार पेठ काॅर्नरला नालीत कचरा झाल्या मुळे भरून गेली आहे व शहरातील दुर्गंधी युक्त पाणी नालीतून वहात मुख्य रस्त्यावर आले आहे.त्यात त्या दुर्गंधी युक्त पाण्या शेजारीच भाजीपाला,फळ विक्रेत्याकडून विक्री करत आहेत.त्या सांडपाण्यात लोकांनी सोडलेले मलमूत्र युक्त पाणी असल्याने त्याची दुर्गंधी तर आहेच पण त्या नालीच्या पाण्या जवळ बसलेल्या भाजी,फळे आरोग्यास किती घातक आहेत.हे सगळ खाऊन नागरिक आजारी पडू शकतात पण 24 घंटे राजकारण करणारे सत्ताधारी व मुख्याधिकारी काय करत आहेत असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.अंबाजोगाई व केज या दोन्ही नगरपंचायत व नगरपालिका यांचा पदभार घेतलेले उत्कृष गुट्टे या कडे लक्ष देतील का? का अशीच नगरपंचायत जनतेच्या आरोग्याशी खेळत राहील?
