तरूणा वर जीवघेणा हमला,३०७ दाखल.
रोखठोक न्युज वार्ताहर
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणावर धारदार कत्ती, चाकू आणि लोखंडी रॉडने डोके, हातावर वार करीत छातीवर दगडाने मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना उत्तरेश्वर पिंप्री ( ता. केज ) येथे घडली. जखमी तरुणावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उत्तरेश्वर पिंप्री येथील अभिषक महादेव दातार ( वय १८ ) हा तरुण केज येथील तांबवेश्वर महाविद्यालयात बीएससी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून मागील दोन महिन्यापुर्वी गावातील आशिष किसन मस्तुद, अभिषेक बारीकराव चंदनशिव, प्रतिक तुकाराम शिंदे, अविष्कार आशोक उघडे यांच्यासोबत गावातील महादेव मंदीराच्या चौकात बोलण्या – बोलण्यावरुन मारामारी झाली होती. गावचे सरपंचासह नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण ग्रामपंचायतीत मिटविले होते. या भांडणाचा राग मनात धरून अभिषेक यास गावातून जाता येता शिव्या देणे, अंगावर थुंकणे असे प्रकार सुरू होते. १२ जानेवारी रोजी ही गावातील जि. प. शाळेच्या पाठीमागे शेतात क्रिकेट खेळत असताना प्रतिक शिंदे याने आमच्या दारात क्रिकेट कशाला खेळतो असे म्हणत शिवीगाळ केली होती. तर १३ जानेवारी रोजी दुपारी अभिषेक हा झोपला असता अभिषेक चंदनशिवचा केवड येथील मित्र रोहन सुदामराव गवळी याने दोन – तीन वेळा फोन तु बाहेर ये, तु अभिषेकला नडतो, तुला आज फोडतो, तुझा मर्डरच करतो. अशी धमकी देत घराबाहेर बोलावले. त्याने घराबाहेर जाऊन पाहिले असता आशिष मस्तुद, अभिषेक चंदनशिव, प्रतिक शिंदे, अविष्कार उघडे, अभिषेक अनंत चंदनशिव, रोहन गवळी, अमर तुपारे हे रस्त्यावर थांबले होते. त्यांच्या हातात धारदार कत्ती, चाकू हे पाहून तो घाबरून पळू लागला. याचवेळी आशिष मस्तुद याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अभिषेक दातार याच्या डोक्यात कत्तीचा वार केला. तुला आज जिवंत सोडणार नाहीत असे म्हणत अभिषेक बारीकराव चंदनशिव याने चाकुसारख्या धारदार हत्याराने डोक्यावर वार करीत हात आडवा केल्याने अंगठ्याला व करंगळीजवळच्या बोटाला जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. रोहन गवळी याने दुचाकीला अडकविलेला लोखंडी रॉड काढून त्याच्या छातीवर मारल्याने तो खाली पडला. त्यानंतर सर्वांनी त्याच्या छातीवर, पोटावर दगड मारले. त्यानंतर त्याचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची आई, मित्र व गावातील भांडण सोडविले. तोपर्यंत तो चक्कर येऊन बेशुध्द झाला. त्याच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविले आले. १४ जानेवारी रोजी शुद्धीवर आल्यावर अभिषेक दातार याने दिलेल्या जबाबावरून आशिष मस्तुद, अभिषेक चंदनशिव, प्रतिक शिंदे, अविष्कार उघडे, अभिषेक अनंत चंदनशिव, रोहन गवळी, अमर तुपारे या सात जणांविरुद्ध केज पोलिसात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात फौजदार वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
