• Thu. Sep 17th, 2026

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून चोरी

Bybaba maske

Jan 29, 2024

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून चोरी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज येथील विश्राम गुहा समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून त्यातील सौंदर्य प्रसाधने व इंधनाची चोरी झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, गुजरात राज्यातील वापी येथून सौंदर्य प्रसाधने व इतर साहित्य घेऊन आलेला ट्रक क्र.(एम एच-०३/डी व्ही-२६१९) केज हा विश्राम गुहा समोर रस्त्यावर उभा असताना दि.२८ जानेवारी ते २९ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान ट्रकची ताडपत्री फाडून त्यातील सौंदर्य प्रसाधने व इंधनाची चोरी झाली आहे. 

या बाबत प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे आणि त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!