• Fri. Apr 24th, 2026

जुन्या पोलीस केसच्या कुरापती वरून मारहाण : सुपारी देऊन खून करण्याची धमकी

Bybaba maske

Jan 29, 2024

जुन्या पोलीस केसच्या कुरापती वरून मारहाण : सुपारी देऊन खून करण्याची धमकी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- गुहेगारांना कायद्याचा धाक उरला नसून कितीही पोलीस केस केल्या तरी माझे काही होणार नाही. असे म्हणून जुन्या पोलीस केसच्या कुरापती वरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून सुपारी देऊन खून करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या प्रकरणी दुसऱ्यांदा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौंदना येथील दत्तात्रय सखाराम गालफाडे हे दि. २७ जानेवारी रोजी रात्री १०:०० वा. च्या सुमारास किराणा दुकानाकडे जात असताना त्यांना प्रदिप भास्कर भिसे याने शिवाजी चौकात अडविले आणि त्यांना म्हणाला की, त्याच्यावर कितीही पोलीस केल्या तरी काही होत नाही. असे म्हणून दत्तात्रय गालफाडे यास जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुपारी देऊन खून करण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी दत्तात्रय गालफाडे यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात प्रदीप भिसे याच्या विरुध्द गु. र. नं. १०/२०२४ भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर), ३ (१) (आर), ३ (१) (एस),३ (१)(पाच), ३ (१)(ए) दाखल झाला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मिना करीत आहेत.

————————————————-

दुसऱ्यांदा गुन्हा :- या पूर्वीही प्रदीप भिसे याने दत्तात्रय गालफाडे यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायद्याचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याने पुन्हा गुन्हेगार आगळीक करीत असल्याने प्रदीप भिसे याच्यावर पुन्हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

—————————————————–

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!