• Fri. Apr 24th, 2026

दारू वहातुक करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना पोलीस पकडला. जिल्ह्यात रोज एकतरी मासा गळाला.

Bybaba maske

Jan 28, 2024

दारू वहातुक करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना पोलीस पकडला.

जिल्यात रोज एकतरी मासा गळाला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – युसुफवडगाव ( ता. केज ) पोलीस ठाण्याचे हवालदार रावसाहेब गणपत मुंडे याला ठाण्याच्या हद्दीत देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शनिवारी ( दि. २७ ) दुपारी रंगेहाथ पकडले.  

    शेतमजूर असलेला तालुक्यातील तक्रारदार हा सध्या देशी दारूचे बॉक्स युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत खेडेगावात वाहतूक करतो. त्यास देशी दारूचे बॉक्स वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचा हवालदार रावसाहेब गणपत मुंडे याने २७ जानेवारी रोजी मागणी केली होती. त्या दोघांमध्ये तडजोड होऊन तेवढी रक्कम देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अगोदर संबंधित पोलीस हवालदाराने लाच मागणी केल्याची पंचासमक्ष खातरजमा करून संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा लावला. २७ जानेवारी रोजी दुपारी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार रावसाहेब गणपत मुंडे याला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

     छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, सहाय्यक फौजदार विठ्ठल राख, जमादार नागरगोजे, जमादार सुनील पाटील, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.जिल्यात रोज एक भष्टाचारी मासा गळाला लागत आहे.यात दोन उपविभागीय अधिकारी आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!