अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्वचे बैठक:लोकसभेचे रणशिंग फुंकले.
रोखठोक न्युज वार्ताहर
आज दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्वच्या दुपारी 3:00 वाजता मा. जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. बैठक सुरू होण्याच्या अगोदर आज दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना अभिवादन करून बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा रणसंग्राम 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी मजबूत करायचे असेल तर गाव तेथे शाखा हा उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांनी शाखेची सुरुवात आपले गाव, आपला मोहल्ला / गल्ली येथून करावी अशा प्रकारचा सूचना मा. जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केल्यानंतर येणाऱ्या आठ दिवसात 50 शाखांचे नियोजन करण्यात आले. आजच्या या बैठकीमध्ये युवक कार्यकर्ते मुस्तफा शेख, विवेक बनसोडे, व शिवकुमार जगतकर यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मित्र परिवारासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यांचे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्वचे महासचिव मिलींद घाडगे, वंचित बहुजन युवा आघाडीचे बीड जिल्हा पुर्व महासचिव बिभीशन चाटे, वंचित बहुजन आघाडीची बुलंद तोफ बीड जिल्हा उपाध्यक्ष बीड पूर्व सचिन उजगरे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रतिनिधी पुष्पाताई बगाडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय रोडे, यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड पूर्व जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंद कासारे, उपाध्यक्ष अमोल पौळे,बीड पश्चिम चे अजय सरवदे,ज्ञञानेश्व कवठेकर, लखन जोगदंड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष खाजामिया पठाण, अंबाजोगाई शहराध्यक्ष गोविंद म्हस्के, वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्व प्रसिद्धी प्रमुख रवी शिरसाठ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या बैठकीला परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
