• Fri. Sep 18th, 2026

मोटार सायकलच्या डिग्गी मधील १लाख २७ हजाराची चोरी

Bybaba maske

Mar 16, 2024

 मोटार सायकलच्या डिग्गी मधील १लाख २७ हजाराची चोरी

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज येथील मुख्य रस्त्यावर भर दुपारी उभ्या मोटार सायकलच्या डिग्गीचे झाकण उचकटून आतील १ लाख २७ हजार रु ची चोरी झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी दुपारी २:३० वा च्या

सुमारास गोविंद मधुकर सोनवणे रा (सारणी आं.) यांनी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांच्या खात्या मधून १लाख २७ हजार रु काढले ते पैसे त्यांनी त्यांची मोटार सायकल क्र (एम एच ४४/पी २९६४) ही मिटकरी यांच्या किराणा दुकानाच्या समोरील रोडवर उभी करून ते एका दुकानात गेले. त्यांनी परत येऊन पाहिले असता मोटार सायकलच्या डीग्गीचे झाकण उचकटलेले दिसले. त्यांनी डिग्गीत पाहिले असता त्यातील १ लाख २७ हजार रु. व बँकेचे पासबुक कोणीतरी अज्ञात चोरट्यानी पळविले असल्याचे निदर्शनास आले.

या बाबत गोविंद मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!