• Fri. Sep 18th, 2026

हादगांव ते सातेफळ रस्ता होतोय निकृष्ठ दर्जाचा सासवडे मॅडम लक्ष द्या,कुठ पंर्यत गुत्तेदार पोसणार?    

Bybaba maske

Mar 16, 2024

हादगांव ते सातेफळ रस्ता होतोय निकृष्ठ दर्जाचा

सासवडे मॅडम लक्ष द्या,कुठ पंर्यत गुत्तेदार पोसणार?

   

,

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

ग्रामीण भागातील रस्ते हे तालुक्यास जोडण्याचे महत्वाचे माध्यम असून याकरिता रस्ते बांधकामांकरीता अनेक योजनांच्या माध्यमातून आवश्यक त्या निधीची पूर्तताही केली जाते.रस्त्यांअभावी अनेक गावे विकासापासून वंचित आहेत.

यासाठीच शासनाकडून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी सबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नसून निकृष्ट कामे होत असल्याने ग्रामीण भागातील गावांची अपेक्षा पूर्ती होत नाही.

याचाच प्रत्यय हादगांव ते सातेफळ डांबरीकरणाच्या कामात आला आहे.

केज तालुक्यातील हादगांव ते सातेफळ डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून राधिका कन्स्ट्रक्शन या  कन्स्ट्रक्शनला काम भेटले असून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.या विभागाच्या अभियंता या सासवडे मॅडम आहेत.त्याच प्रत्येक काम ऊंटा वरून शेळ्या राखण्या सारखे असते 

हादगांव ते सातेफळ रस्त्याचे काम संबधित ठेकेदार काम निकृष्ठ करत असून या कामावर संबधित अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन सदरील रस्ता दर्जेदार करुन घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

हादगांव ते सातेफळ रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांसह वाहन चालकांना दीलासा मिळाला होता.अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झालेली होती.रस्त्याचे काम झाल्यानंतर प्रवास सुखाचा होईल अशी अपेक्षा होती मात्र रस्त्याच्या होत असलेल्या निकृष्ठ कामामुळे एक वर्षातच हा रस्ता उखडून पडेल अशी भीती नागरिकांना वाटत आहे.

संबधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कामात गुत्तेदाराकडून हलगर्जीपणा सुरू असून या कामाकडे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष सुरू असलेले निकृष्ठ दर्जाचे काम थांबवून दर्जेदार रस्ता करून घ्यावा अशी मागणी हादगांव येथील नागरिकांकडून कऱण्यात येत आहे

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!