यश कन्स्ट्रक्शन चा कहर,निकृष्ठ कामाचा जबाब विचारला म्हणून गुन्हा दाखल.
आतापर्यंत पत्रकार व युवकांवर गुन्हे दाखल.
76 कोटीतुन शहरात निकृष्ठ कामे चालू .
नगरपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र नसताना भलतीकडेच कामे चालु.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत हद्दीत 76 कोटीचे नाली, रस्ता बांधकाम करणे चालु आहे गेल्या चार पाच महिन्यांपासून हे रेंगाळत काम चालु आहे.हे काम नगरपंचायत चे असतातना नगरपंचायत ने अनामत रक्कम नसल्याचे कारण देत हे काम सार्वजनिक बांधकाम विभागा कडे वर्ग केले त्यानुसार 76 कोटीचे कामे यश कन्स्ट्रक्शन लातूर यांना टेंडर नुसार मंजूर झाले,त्यात यानी नगरपंचायत नाहरकत प्रमाणपत्र घेतले त्यात नगरपंचायत ने नमुद केले की जे मंजूर रस्ते आहेत त्यावर कुठलेच अतिक्रमण नाही पण सर्व शहरातील रस्त्यावर अतिक्रमण झालेले असताना खोट्या नाहरकत प्रमाणपत्रा सह शहरात कामे चालु केली.
यात कंळब रोड ते जुना टाकळी रस्ता वीटभट्टी पंर्यत असे काम चालु केले पण वर्क ऑर्डर नुसार ते टाकळी रस्ता नसून चिंचोली जुना रस्ता असा प्रस्तावित असताना चुकीच्या मार्गाने रस्ता बनवला तो रस्ता पत्रकार साजेद इनामदार यांच्या शेतातून जात असल्या कारणाणे त्यांनी तो आडवला त्या वेळेस टिप्पर चालकाच्या फिर्यादीवरून पत्रकार साजेद इनामदार यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला व त्याला 10 दिवस बीड च्या जेल मध्ये रहावे लागले.
त्यानंतर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काम चालु असताना निलेश मस्के यांनी निकृष्ठ काम होत आहे म्हणून जबाब विचारला तर यश कन्स्ट्रक्शन ने त्यांच्या टिप्पर चालकाच्या फिर्यादीवरून मारहाण करून खिशातील मोबाईल पळवल्याचा गुन्हा दाखल केला.जर जबाब विचारणाऱ्या युवकांवर यश कन्स्ट्रक्शन फिर्यादी देऊन गुन्हे दाखल करत असेल तर उद्याच भविष्य काय असेल.?
दिनांक 20/11/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष यांनी याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागात केली आहे व सदरील कामाची गुणनियंत्रण कार्यालया कडून चौकशी करावी अशी मागणी केलेली असताना अजून पंर्यत चौकशी झाली नाही पण युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून आपली भष्टाचाराची पोलखोल होऊ नये किंवा इतरानी भष्टाचाराची साधा आवाज ही उठवू नये म्हणून ही यश कन्स्ट्रक्शन दादागिरी आहे.
या सर्व कामाची विभागीय चौकशी झाली पाहिजे असे नागरिकात चर्चा आहे.ज्या ठिकाणी प्रस्तावित रस्ते नसताना रस्ते केले त्याचीही चौकशी झाली पाहीजे.बोगस,निकृष्ठ रस्ते करून उलटे जबाब विचारणाऱ्या युवकांना जेल मध्ये टाकण्याच्या धोरणाणे शहराती सामाजिक काम करणारे,राजकीय कामकरणारे नागरिकात दहशत निर्माण करून सदरील 76 कोटीचे बोगस, निकृष्ठ कामे करण्यात येत आहेत.याची शासनाने गंभीर दखल घ्यावी नाहितर नागरिक रस्त्यावर उतरतील असे केज शहरात चर्चा आहे.
