• Fri. Sep 18th, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या संवाद सभेत शेकाप नेत्याच्या खिशातून १७ हजार ५०० चोरीला

Bybaba maske

Mar 17, 2024

मनोज जरांगे-पाटील यांच्या संवाद सभेत शेकाप नेत्याच्या खिशातून १७ हजार ५०० चोरीला

रोखठोक न्युज वार्ताहर

केज येथील शेकापचे पदाधिकारी मोहन दत्तू गुंड हे १४ मार्च रोजी स मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये मनोज जरांगे यांच्या संवाद सभेच्या नियोजनासाठी गेले होते. दुपारी १२ वाजता मनोज जरांगे हे आले असता त्यांना मोहन गुंड हे इतर सहकाऱ्यांसह गेटवरून स्टेजवर घेऊन गेले. सभेनंतर कार्यक्रमासाठी आलेल्या कलाकारांना त्यांचे मानधन देण्यासाठी मोहन गुंड यांनी पँटच्या पाठीमागील खिशात ठेवलेले पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. मात्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील १७ हजार ५०० रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. मोहन गुंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!