अजित पवार गटाला झटका पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बजरंग सोनवणे यांचे बंड !
अजित पवार गटाला झटका पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बजरंग सोनवणे यांचे बंड !
बजरंग सोनवणे शरद पवार यांच्या गटाकडून बीड लोकसभा लढविणार ?
मित्र मंडळाच्या तातडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी पालक मंत्री आणि आमदारा विरुद्ध व्यक्त केली मनातील खदखद !
सत्ता असताना विरोध होत असल्याने कार्यकर्त्यांनी खंत !
२०१९ च्या ज्यांचा विरोध केला त्याच पंकजा मुंडे यांचा प्रचार कसा करणार !
बजरंग सोनवणे भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी !
रोखठोक न्युज

गौतम बचुटे/केज :- अजित दादा पवार यांच्या गटाला आणि पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यात मोठा झटका बसला अडून शेतकरी पुत्र म्हणून परिचित असलेले मोठे प्रस्थ बजरंग सोनवणे हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देवुन पून्हा शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारीत असल्याचे केज येथील बजरंग सोनवणे यांच्या पवन सूत बंगल्यावर आयोजित केलेल्या तातडीच्या मित्र मंडळाच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. याला कारण
बजरंग सोनवणे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार नमिता मुंदडा या डावलत असल्याने बजरंग सोनवणे यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. बजरंग सोनवणे हे लवकरच निर्णय जाहीर करतील म्हणून या तातडीच्या बैक्तीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करून भावना मोकळ्या केल्या.
दि. १५ मार्च रोजी बजरंग सोनवणे मित्र मंडळाने केज येथे बजरंग सोनवणे यांचा पवनसूत या निवासस्थानी केज तालुक्यातील प्रमुख कार्यरकर्ते, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक संपन्न झाली.
बैठकीत कार्यकर्त्यांनी पालक मंत्री धनंजय मुंडे आणि विद्यामान आमदार नमिताताई मुंदडा या बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचे भावना व्यक्त केली. तसेच बजरंग बाप्पा यांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे सत्तेत आहोत की नाही ? अशी कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे स्वाभानी कार्यकर्ता दुखावला जात आहे. तसेच २०१९ च्या लोकसभेत बजरंग सोनवणे यांचा अगदी निसटत्या मतांनी पराभव झाला. परंतु ज्या मुंडे यांच्या विरोधात लोक सभा निवडनुक लढविली त्यांचाच आता प्रचार कसा करावा ? अशी खदखद व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांची खदखद पाहता आता बजरंग सोनवणे हे अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांना सोडून शरद पवार यांची तुतारी हाती घेऊन लोकसभेच्या मैदान पुन्हा उतरण्याची तयारी झालेली आहे. मात्र या बैठकीला बजरंग सोनवणे हे उपस्थित नव्हते किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
या बैठकीला, जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब बोराडे, जोगदंड, शिवाजी ठोंबरे, शिवाजी चौधरी, भाऊसाहेब गुंड, मुकुंद कणसे, कपिल मस्के, सूरज पटाईत, सय्यद शरीफ, संतोष जोगदंड, बप्पा जोगदंड, खतीब, बाळासाहेब गलांडे, श्रीहरी जाधव, तारळकर, रुपेश बोरगावकर, अमर मुळे, रमेश इंगळे, गजानन इंगळे, सुधीर रानमारे, गणेश सावंत, बाळासाहेब लाड, नवनाथ काकडे, शीतल लांडगे शेखर सिरसट यांच्यासह केज तालुक्यातील बजरंग सोनवणे समर्थक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————
बैठक अध्यक्ष निवडीची पण मागणी लोकसभेची ! :-सदर तातडीची बैठक ही बजरंग बाप्पा सोनवणे मित्र मंडळाच्या तालुका अध्यक्षांच्या निवडीसाठी जरी आयोजित केल्याचे दर्शविण्यात आले होते मात्र या बैठकीत बजरंग सोनवणे यांनी अजित दादा पवार आणि पालक मंत्री ना धनंजय मुंडे व आमदार नमिता मुंदडा हे त्यांची गळचेपी करीत असल्याचे कारण सांगून लोकसभेच्या निवडणुकीची तुतारी फुंकली आहे.
