• Fri. Sep 18th, 2026

नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या बदली संदर्भात निवडणूक आयोगा कडे वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Bybaba maske

Mar 21, 2024

नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या बदली संदर्भात निवडणूक आयोगा कडे वंचित बहुजन आघाडीची मागणी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तहसील कार्यालयात गेल्या पाच वर्षांपासून कुंडली मारून बसलेले नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांची बदली संदर्भात दि 20/3/2024 रोजी केज निवडणूक निर्वाचन आधिकारी यांच्या मार्फत निवडणूक निर्णय आयोगास निवेदन देण्यात आले त्यात वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांनी नमूद केले की केज तहसील कार्यालयात नायबतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण धस हे गेल्या पाच वर्षा पासुन जिल्यात व तालुक्यात कार्यरत आहेत.ते सदरील केज तालुक्याचे रहिवासी असल्या कारणाणे निवडणूकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग येतो तरी निवडणूक आयोगाच्या अटी नुसार त्यांची बदली ही तात्काळ करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली आहे.या उपरही कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांनी दिला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!