• Thu. Jun 4th, 2026

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार. रोखठोक न्युज वार्ताहर  

Bybaba maske

Mar 21, 2024

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – केज तालुक्यातील बावची येथील बाबासाहेब रंगनाथ नांदे (वय ६०) हे आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता युसुफवडगाव येथे मुलीला ! भेटण्यासाठी गेले. मुलीला भेटून दुपारी दीड वाजता दुचाकीवरून (एम. एच. ४४ एच. १५३४) गावी परत येत असताना ज्योतिबाच्या मंदिराचे पुढे वळणावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची दिली. या अपघातात गंभीर झालेल्या बाबासाहेब नांदे यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री सव्वा आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. अशी तक्रार १९ मार्च रोजी त्यांची पत्नी मंडूबाई नांदे यांनी दिल्यावरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित वाहन चालकाचा आणखी तपास लागलेला नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!