• Sun. Apr 19th, 2026

अपघातग्रस्तांना मदत करताना चौघांना टँकरची धडक, एका जणाचा मृत्यू

Bybaba maske

Mar 22, 2024

अपघातग्रस्तांना मदत करताना चौघांना टँकरची धडक, एका जणाचा मृत्यू

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड- अपघात ग्रस्तांना मदत करत असतांना पाठीमागून आलेल्या टँकरने चौघा जणांना जोराची धडक दिली. या अपघातात एका जणाचा मृत्यू तर तिघेजण जमखी झाले. जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्री १०.३० च्या दरम्यान पालीजवळ घडली. या दुदैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री पालीजवळ एक अपघात झाला होता. या अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वप्नील बंगाडी व त्यांचे इतर तीन सहकारी थांबले जखमींना उपचारासाठी घेवून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगात टँकरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये स्वप्नील बंगाडी (वय ४३ रा. बीड) हे गंभीर रित्या जखमी होवून मरण पावले तर प्रदिप पिसे (वय ४५), तुषार काळकुटे (वय ३५), कपील जरांगे (वय ३५) या तिघांनाही मार लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात करण्यात आले. या दुदैवी अपघातात बंगाडी हे मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. टँकर चालकाविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!