• Thu. Jun 4th, 2026

देवेंद्र फडणवीसांचा पी. ए. असल्याचे सांगत केली १५ लाखांची फसवणूक

Bybaba maske

Mar 23, 2024

 देवेंद्र फडणवीसांचा पी. ए. असल्याचे सांगत केली १५ लाखांची फसवणूक

रोखठोक न्युज वार्ताहर 

हल्ली फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. फक्त सेलिब्रेटीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची देखील फसवणूक केली जात आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए. असल्याचे सांगत तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आपण देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए आहे, असे सांगत दोन जणांनी सोसायटीचे काम करून देण्याच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक केली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी दोघांची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील एका जणावर या पूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

अशातच आता या दोघांवर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात १७०, ४१९, ४२०,३४ भा द वी कलमातर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!