बजरंग सोनवणेची बजरंगी उडी पडणार विरोधकांना भारी !
शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी फक्त घोषणा बाकी.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)या पक्षात येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा परिषद बीड चे उपाध्यक्ष व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बंजरग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर ते बीड लोकसभा लढवतील असा अंदाज बांधला जात होता.पण आता सुत्राच्या माहितीनुसार बंजरग सोनवणे यांची उमेदवारी फिक्स झाली असून फक्त घोषणाच बाकी आहे.त्या अनुषंगाने बंजरग सोनवणे यांनी संपर्क वाढवला आसुन त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.त्याच मुळे भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे व बंजरग सोनवणे असा सामना बघायला मिळू शकतो गेल्या पंचवार्षिक लोकसभेत बजरंग सोनवणे यांना पंकजाताई यांच्या भगिनी प्रितमताई यांच्या विरोधात तब्बल पाच लाख ९ हजार ८०७ मते मिळविली होती.
आताच्या लोकसभेत मराठा आरक्षण हा मुद्दा खुप पेटलेला आहे या वेळेस जातीवर मतदान होणार आहे.त्या मुळे व शरद पवार गटाला असलेल्या सहानुभूती वर बंजरगांची उडी विरोधकांना महाग पडेल असे चित्र सद्या तरी दिसत आहे.
