निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश आंबेडकरांनी केली सर्वात मोठी घोषणा
रोखठोक न्युज वार्ताहर
सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे.
प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत युती करणार का नाही? हे अजूनही स्पष्ट झाले नाही. असे असताना त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. शाहू महाराजांना (Shahu Maharaj) काँग्रेसकडून (Congress) कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.
“शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानत असून तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
