• Thu. Jun 4th, 2026

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून.  पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

Bybaba maske

Mar 27, 2024

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून.

 पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

रोखठोक न्युज वार्ताहर 

तलवाडा – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नीला मारून मृतदेह घरात ठेवून पतीने दाराला बाहेरून कडी लावून तीन चार दिवस ठेवले, मुलीचे सासु-सासरे चार धाम यात्रा करून घरी पाहाटे परतल्यानंतर घराला बाहेरून कडी लावलेली उघडुन आतमध्ये प्रवेश करताच पलंगावर सुनेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पती अशोक करवे याला अटक करून गेवराई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षा हीचे लग्न 2021 मध्ये आशोक कर्वे (रा, भोगलगाव ता. गेवराई जि. बीड) यांच्यासोबत झाले होते. तेंव्हापासून पती अशोक हा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून पत्नीला त्रास द्यायचा, याबाबत वर्षा हिने आपली आई आणि वडील यांना फोन करून कळवले ही होते. परंतु असे काही घडेल याची कल्पना ही वर्षाच्या आई वडिलांना नसल्याने त्यांनी सर्व ठीक होईल अशी भावना मनात ठेवून या बाबीकडे कानाडोळा केला, परंतु अशोक ने पत्नीला संपवलेच ही घटना वर्षाचे सासू सासरे हे दि. 24 मार्च रोजी सकाळी पाहटे पाच वाजण्याच्या सुमारास दोघेही दोन धाम यात्रा करुन घरी सकाळी पाहटे चार वाजण्याच्या दरम्याण भोगलगाव येथे आले असता घरी जावुन पाहीले तर घराचे दाराची बाहेरुन कडी लावलेली त्यांना दिली त्यांनी कडी उघडुन घरात प्रवेश केला असता वर्षा ही मृतदेह अवस्थेत दिसली. यावेळी शाहुराव कर्वे यांनी ताबडतोब मुलीच्या आई वडीलाना फोन लावून तुम्ही लवकर या असा निरोप दिला.

 

वर्षाचे आई वडील लागलीच भोगलगाव येथे आले, यावेळी गावातीलही बरेच लोक जमा झाले होते, त्याच बरोबर पोलिसांना ही खबर केलेली असल्याने पोलीस ही घटनास्थळी आल्यानंतर घरात जावुन पाहीले तर मुलगी लोखंडी पलंगावर मृतदेह अवस्थेत पडलेली होती, तिच्या शरिराचा वास येत होता व तोंडावर मानेवर डोक्यावर आळ्या पडलेल्या होत्या माझ्या मुलीचा मृत्यु दोन तिन दिवसा पूर्वी झालेला असावा माझ्या मुलीला माझा जावाई नामे आशोक शाहराव कर्वे यानेच मारले असल्याची शंका मुलीच्या वडिलांनी बोलून दाखवली अशोक हा नेहमी तुला मी सांभळनार नाही असे म्हणुन सारखा छळत होता. तेव्हा मुलगी मला वेळोवळी फोन वर सांगायची की पप्पा मला दोन महिन्यांपासून त्रास देत आहे. वर्षा चे पती आशोक कर्वे चा नेहमी संशय असायचा तिला सारखे म्हणायचा तुझे पहीले लग्न झालेले होते तु तेव्हा काही केले अशील तु मला नको आहेस तु ईथे राहीलीस तर तुला मी मारून टाकीन अशी नेहमी धमकी द्यायचा गेल्या चार पाच महीण्यापुर्वी तिला मारहान करुन तुझे लेकरु माझे नाही असे म्हणून तिच्यावर संशय घेवुन तिच्या पोटात लाथा बुक्या घातल्यामुळे तिच्या पोटातील गर्ब बाहेर पडला होता, तेव्हा मी तिला सरकारी दवाखाना बीड येथे घेवुन उपचार केले होते. दि. 21 मार्च 2024 रोजी दुपारी 02.00 वा सुमारास मुलगी वर्षा हीने मला फोन करून सांगीतले की मला माझा नवरा आशोक हा खुप त्रास देत आहे. आणि म्हणत आहे की मी तुला सांभाळनार नाही तु जर गेली नाही तर तुला मी जिवे मारीन नेहमी अशी धमकी देत होता तेव्हा मी तिला म्हणालो की तु थोडा धिर धर आपण त्याला समजावून सांगु असे म्हणुन मुलीची

 

समजुत काढली होती. वर्षा भोगलगाव शिवारातील शेतातील घरात आशोक कर्वे यांनी तिला कशाने तरी मारहान करुन किंवा गळा दाबुन किंवा काही तरी करुन जिवे ठार मारले असल्याची फिर्याद धर्मराज बाबुराव खवले (वय वर्षे 48 रा, कवडगाव ता, अंबड जि, जालना) यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून कलम 302,304-3,323,498,506 प्रमाणे आरोपी अशोक शाहुराव कर्वे यांच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलवाडा प्रथामिक आरोग्य केंद्र येथे आणला असता डॉ. पुजा शेळके, डॉ. अक्षय खरवडे यांनी शवविच्छेदन केले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच गेवराई न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सपोनी सोमनाथ नरके यांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब भवर हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!