शरद पवारांच्या मराठा कार्ड च्या खेळीला भाजप चा चकवा.
मराठा-मराठा विरुद्ध ओबीसी अशी लडाई?
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड लोकसभे साठी भाजप ने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी दिल्या नंतर महाविकास आघाडी कुठे तरी मागे पडली होती.पण पंकजाताई विरोधात मराठा नेते तथा शिवसंग्राम चे प्रमुख स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विचारणा झाल्याचे बोलले जात होते.पण ज्योतीताई मेटे यांनी निर्णय जाहीर केला नव्हत त्यातच पंकजाताई मुंडे यांनी भाषणात सांगीतले की शिवसंग्राम आमच्या सोबत आहे पण कोणती शिवसंग्राम ते सांगितल नव्हते,कारण शिवसंग्राम मधून विनायक मेटे यांचे बंधु रामहरी मेटे हे बाहेर पडुन खरी शिवसंग्राम माझीच आहे म्हणून सांगतात.
अश्यातच येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेची तयारी चालु केली होती व भेटी गाठी चालु केल्या होत्या त्यातच काल मिडीयातुन बातम्या येऊ लागल्या ज्योतीताई मेटे या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास गेल्या.त्यानंतर आज ज्योतीताई मेटे यांनी आपल्या सहआयुक्त निबंधक या पदाचा राजीनामा दिला व लोकसभा लढवणार असे शिवसंग्राम चे कार्यकर्ते म्हणु लागले.
ज्योतीताई मेटे राजीनामा दिल्यानंतर स्वर्गीय विनायक मेटे यांच्या समाधी स्थळी जाऊन दर्शन ही घेतले पण आपण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे जाहीर केले नाही. तसेच त्या मनोज जरांगे-पाटील यांच्या म्हणण्यानुसार अपक्ष लढणार, त्यामुळे संभ्रम वाढायला लागला आहे.
जर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाकडून बंजरग सोनवणे यांना उमेदवारी दिली तर ज्योतीताई मेटे या अपक्ष निवडणूक लढवतील स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणा साठी खुप काम केले आहे.राज्यात त्याची मराठा नेते म्हणून ओळख होती व ते मराठा आरक्षण संबंधित बैठकीला जात असतानाच त्याचा अपघात झाला होता व त्यात ते मृत झाले होते ती मराठा समाजाची सहानुभूती ज्योतीताई मेटे यांच्या बरोबर असेल.त्या मुळे दोन मराठा उमेदवार लढाई होऊन पंकजाताई यांचा विजय सोपा जाईल.त्यामुळेच ही राजकीय खेळी असल्याची भावना कोठे तरी शंकास्पद वाटत आहे.
जोपर्यंत शरद पवार गट उमेदवार घोषित करत नाहीत व ज्योतीताई मेटे व बंजरग सोनवणे या पैकी कोण हे घोषित होत नाही तोपर्यंत बीड लोकसभा चर्चेत राहील हे मात्र खरे.
