• Fri. Sep 18th, 2026

रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला  घात की अपघात चर्चेला उधाण.

Bybaba maske

Mar 28, 2024

रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला

 घात की अपघात चर्चेला उधाण.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील विडा परिसरात आज गुरुवारी (दि.28 मार्च ) सकाळी रस्त्याच्या कडेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या डोक्याला जबर मार लागून मेंदू बाहेर पडलेला दिसून येत होता. यामुळे हा घातपात की, अपघात अशा उलटसुलट चर्चेला उधाण आले. मात्र मृतदेह आढळून आल्यामुळे विडा परिसरात खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील केज ते विडा रस्त्यावर पिंपळगाव-विड्याच्या मध्ये रस्त्याच्या कडेला आज सकाळी अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती मिळणच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सदर घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. अद्याप पर्यंत सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पुढील तपास केज पोलिस करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!