• Fri. Sep 18th, 2026

शेतकरी तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Bybaba maske

Apr 10, 2024

शेतकरी तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

रोखठोक न्युज वार्ताहर

केज तालुक्यातील माळेवाडी येथील सागर बाळासाहेब चंदनशिव वय वर्ष २६ शेतकरी तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सविस्तर घटना अशी की सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान सागर चंदनशिव घराशेजारील शेतामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीकडे गेले होते. त्यादरम्यान त्यांचा विहिरीमध्ये पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीच्या आजूबाजूला कोणीही नव्हते त्यांचे जनावरे त्यांच्या घरी वापस गेल्यानंतर जनावरे दिसू लागली परंतु सागर चंदनशिव दिसत नसल्याचे कुटुंबाला आढळून आले त्यांनी शोधाशोध केली. ते दिसून येत नव्हते काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की जनावरांना पाणी पाजण्यासाठी सागर चंदनशिव हे विहिरीकडे गेले होते. त्यानंतर कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली त्यामध्ये सागर चंदनशिव हे विहिरीमध्ये पडून मृत अवस्थेत निदर्शनास आले. त्यानंतर दुरुक्षेत्र नांदुर घाट पोलीस चौकीचे बीट आमदार उमेश आघाव व पोलीस नाईक बाळराजे सोनवणे यांना दूरध्वनीवरून गावकऱ्यांनी फोन केला घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमार्टम साठी नांदुर घाट ग्रामीण रुग्णालय येथे बॉडी हलवण्यात आली या घटनेमुळे माळेवाडी व परिसरामध्ये पाडव्याच्या सणा दिवशीच दुर्दैवी घटना घडल्या बद्दल शोककळा पसरली आहे. सागर चंदनशिव यांचे लग्न काही महिन्यांपूर्वी झाले होते. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने चंदनशिव कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!