• Fri. Sep 18th, 2026

नाना पटोलेंचा अपघात, काँग्रेसच्या दाव्यानं खळबळ…त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न

Bybaba maske

Apr 10, 2024

नाना पटोलेंचा अपघात, काँग्रेसच्या दाव्यानं खळबळ…त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न

रोखठोक न्युज वार्ताहर 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली. काल रात्रीच्या दरम्यान प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात नाना पटोले यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

दरम्यान, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून परतत होते. त्यावेळी ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरात धडक दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले हे ज्या कारमध्ये बसले होते, त्यांच्या कारच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणाला दुखापत झाली नाही..

पण याच अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.”

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!